महानगर पालिका उर्दू केंद्र शाळा क्र.25 धुळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ..

धुळे (अनिस खाटीक)
M.N.P. उर्दू केंद्र शाळा क्र. 25 धुळ्यायाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर यावर्षी इयत्ता 10 वी मध्ये प्रथम, द्वितीय,
तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या या शाळेतील माजी विद्यार्थी व त्यांच्या पालकां

चा हाजी गुफरान सेठ पोपट वझे (शिक्षण प्रेमी व माजी अध्यक्ष, शाळा मंडळ, धुळे मानपा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्यामध्ये विद्यार्थिनींना प्रमाणपत्र, चषक व विविध भेटवस्तूंसह पालकांना पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थिनींमध्ये मारिया बानो कुदरत अलकामा बानो मोहम्मद आबिद, सनोबर बानो सईद अहमद, अल्बिना बानो अशफाक अहमद आणि मारिया बानो मोहम्मद हुसेन यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी 1 ली ते 7 वी पर्यंतचे शिक्षण या मनपा शाळा क्रमांक 25 धुळे येथे घेतले आहे. यावेळी हाजी गुफरानसेठ पोपट वझे यांनी आपली चिंता व्यक्त करून भविष्यात या शाळेतून शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी अब्दुल हफीज भाई, जाहीद भाई किराना वाले, वकील भाई, नवीद भाई, वकील भाई शूटिंग चॅम्पियन, कमरुन्निसा आपा व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शाळेच्या मुख्याध्यापिका नूर जमाल बानो मॅडम यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत समजावून सांगितले. या कार्यक्रमास शाळा क्र.25 चे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.