पोदार प्रेप येथे ‘आत्मनिर्भर भारत’ – स्वतंत्रता दिवस साजरा..

0

एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर)

७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले, यांत विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या आजी-आजोबांनी कार्यक्रमास हजेरी लावली. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आधी विदयार्थ्यांनी स्वतंत्र व जागरुक आणि स्वायत्त बनले पाहिजे व त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, बांधिलकी या गरजेचे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध गुणांची जोपासना होणे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यात विद्यार्थ्यांनी आजी – आजोबांच्या मदतीने भारतातील शहरांची नावे व त्यांची विशेषता यांचे विलगी- करण केले. बौद्धीक पातळी वाढण्यासाठी विविध ठोकळ्यांच्या कृतींचे आयोजन करण्यात आले तसेच या कार्य- क्रमात काही प्रश्न व उत्तरांचेही आयोजन करण्यात आले यात विविध स्थळांचे चित्र दाखवण्यात आले व ते कोणत्या शहरात आहे हे ओळखायला लावले. भारताने नुकतेच चंद्रयान ३ अवकाशात सोडल्यामुळे विदयार्थ्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी काही विदयुत उपकरणांची माहिती खेळांच्या माध्यमातून देण्यात आली. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे व त्याचा सर्वांगीण विकास करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकांचा व आजी- आजोबांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन सर व मुख्याध्यापिका सौ. उमा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!