मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर,सर्व मंत्र्यांना स्नेहभोजनासाठी सहकुटुंब निमंत्रण..

24 प्राईम न्यूज 17 Aug 20230 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू आहे. आजारपणाचे कारण देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच दूर केले जाईल, अशा चर्चांना ऊत आला असतांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाल्याचे संकेत मिळत आहेत. मुख मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना सहकुटुंब प ताज हॉटेलमध्ये स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिल्याचे मुख वृत्त आहे.
शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड या हॉटेलमध्ये गुरूवारी संध्याकाळी ७ वाजता हे स्नेहभोजन पार पडणार आहे. अजित पवार गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसाठी आयोजित केलेले हे पहिलेच स्नेहभोजन असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांसोबत बैठकही घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या स्नेहभोजनाकडे – अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.