नागरिकांची आता लवकरच कागदी पासपोर्टच्या कटकटीतून सुटका होणार आहे.

24 प्राईम न्यूज 21 Aug 2023 नागरिकांची आता लवकरच कागदी पासपोर्टच्या कटकटीतून सुटका होणार आहे. पासपोर्टधारकांना चिप असलेला ई-पासपोर्ट मिळणार आहे. या पासपोर्टमध्ये ४१ प्रकारची विविध वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तब्बल १४० देशांमध्ये इमिग्रेशन प्रक्रिया जलद होणार आहे. सदरचे ई-पासपोर्ट तयार करण्याचे काम केंद्र सरकारने नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसला दिले आहे.
देशातील सामान्य नागरिकांना येत्या दोन महिन्यांत हा पासपोर्ट उपलब्ध होणार आहे. ई-पासपोर्ट सध्याच्या कागदीपासपोर्ट सारखाच असणार आहे. पुस्तिकेप्रमाणेच दिसायला असलेल्य या पासपोर्टच्या मध्यभागी एका पानावर रेडिओ फिक्वेन्सी
आयडेंटिफिकेशन चिप आणि शेवटी एक लहान फोल्डेबल अँटेना असणार आहे. दरम्यान सदरच्या चिपमध्ये संबंधितांचा बायोमेट्रिक तपशीलआणिआधीच्यापासपोर्ध्ये
असलेल्या माहितीचा समावेश असणार आहे.