गावितांना ‘ऐश्वर्या रायचे डोळे’ भोवणार,
– राज्य महिला आयोगाची नोटीस.

24 प्राईम न्यूज 23 Aug 2023 ऐश्वर्या राय रोज मासे खायची, म्हणून तिचे डोळे सुंदर झाले आहेत, हे वक्तव्य मंत्री विजयकुमार गावित यांना भोवण्याची चिन्हे आहेत. सत्तेत नुकतेच सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी विजयकुमार गावित यांना या वक्तव्याबद्दल नोटीस बजावत तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
एका कार्यक्रमात डॉ.विजयकुमार गावित म्हणाले होते की, “तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? ती बंगळुरूला समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. तिचे डोळे बघितले ना? गावितांच्या या वक्तव्याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त करत “गावित यांनी केलेला उल्लेख महिलांचा अपमान करणारा आहे. महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार डॉ. गावित यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उत्तर सादर करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे.