कांद्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात सामना रंगला. – पवारांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर.

24 प्राईम न्यूज 23 Aug 2023 कांद्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सामना रंगला आहे. मी केंद्रात कृषी मंत्री असताना कांद्यावर कधीही ४० टक्के निर्यात शुल्क लावले नव्हते. कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्राने परत घ्यावे. केंद्राने कांद्याला प्रतिक्विंटलला दिलेला २४१० रुपयांचा भावही कमी आहे. त्याऐवजी प्रतिक्विंटल ४ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली. शरद पवारांच्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषी मंत्री होते. त्यावेळी देखील कांदा उत्पादकांवर संकट निर्माण झाले होते, पण त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी संकटकाळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत उभे राहिले,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कांद्यासंदर्भात झालेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले.”पहिल्यांदाच केंद्राने हस्तक्षेप करून शेतकन्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याविषयी केवळ राजकारण न करता शेतकयांच्या मागे उभे राहिले पाहिजे. शरद पवारसाहेब मोठे नेते आहेत. ते केंद्रावर्षे कृषी मंत्री होते. त्यावेळी देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण कांद्या बाबत असा निर्णय संकटकाळात घेतला गेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संकटकाळात महाराष्ट्रातील शेतकऱ्या सोबत उभे राहिले. साखर उद्योग देखील अडचणीत होता, तेव्हा केंद्राकडे गेलो. दहा हजार कोटींच्या आयकरात सवलत देण्याचा निर्णय केंद्राने पहिल्यांदा होता. या निर्णयाचे कारण न करता स्वागत केले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शरद पवार यांनी देखील पलटवार केला आहे. मी केंद्रात कृषी मंत्री असताना कांद्यावर कधीही ४० टक्के निर्यात शुल्क लावले नव्हते कांद्या वरील निर्यात शुल्क केंद्राने परत घ्यावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.