सचिन निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन बनला..

24 प्राईम न्यूज 23 Aug 2023
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला निवडणुकीतील मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून घोषित केले आहे.
तेंडुलकर आणि आयोग यांच्यात आज करार होणार आहे. या तीन वर्षांच्या करारात तेंडुलकर मतदारांमध्ये जागरुकता वाढवणार आहेत. विशेषत: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत यामुळे तरुणांचा सहभाग वाढेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. गेल्या वर्षी अभिनेता पंकज त्रिपाठी याला नामांकन मिळाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यापूर्वी एमएस धोनी, आमिर खान आणि मेरी कोम हे राष्ट्रीय आयकॉन होते.