नाफेडकडून कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची दिशाभूल, – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

24 प्राईम न्यूज 23 Aug 2023
नाफेडमार्फत कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. सरकार निर्यात शुल्क कमी का करत नाही? यापूर्वीही कांद्याचे दर पडल्यानंतर नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते, पण प्रत्यक्षात नाफेडने कांदा खरेदी केलाच नाही. कांदा नाशवंत आहे, तो खराब झाला तर त्याची भरपाई सरकार देणार आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंतकवादी, नक्षलवादी, आंदोलनजीवी, खलिस्तानी म्हणून त्यांचा अपमान केला, हे शेतकरी विसरलेले नाहीत. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजप आणि नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना काहीही अपेक्षा नाहीत. शेतकरी पेटून उठला तर भाजपचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही.