कांदा नर्यात शुल्क रद्द करा. – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

24 प्राईम न्यूज 23 Aug 2023 कांदा निर्यात शुल्क रद्द करा कांदा निर्यातीवर ४०टक्के शुल्क आकारण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे. राज्य सरकारने कांद्याला ३५० रुपये अनुदान देण्याचे आश्वासन विधिमंडळात दिले होते, मात्र अद्यापही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. केंद्राचे आयात-निर्यात धोरण हे शेतकऱ्यांचे फायद्याचे नाही तर व्यापाऱ्यांच्या फायद्याचे आहे.