अंतराळात भारतानं इतिहास घडविला. दक्षिण ध्रुवावर लँडींग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.

24 प्राईम न्यूज 24 Aug 2023. अखेर 6 वाजून 4 मिनिटांनी तो क्षण आला.. आणि सॉफ्ट लँडींग करीत चांद्रयान-3 अगदी अलगद पणें चंद्रावर उतरले


अंतराळात भारतानं इतिहास घडविला. दक्षिण ध्रुवावर लँडींग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. इस्त्रोच्या वैज्ञानिकांसह 140 कोटी भारतीयांनी पाहिलेलं स्वप्न या निमित्ताने पूर्ण झालं. बंगळुरच्या इस्त्रोच्या नियंत्रण कक्षात वैज्ञानिकांनी जल्लोष साजरा केला. त्याचवेळी लाईव्ह असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन अभूतपूर्व यशाबद्धल सर्वांना शुभेच्छा दिल्या, वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं.चंद्राच्या कोणत्याही भागात यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवलं आहे. मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ठसा उमटविणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. चांद्रयान-2 चा अनुभव लक्षात घेता ही मोहिम यशस्वी होणार की नाही, याबद्दल साऱ्यांनाच चिंता होती. मात्र, यानाचं लँडीग यशस्वी झाल्याचं नियंत्रण कक्षातील स्क्रीनवरून स्पष्ट होताच देशभरात जल्लोष साजरा झाला.