१०८ रुग्णवाहिका चालक जाणार संपावर : निवेदाद्वारे मागणी.

एरंडोल( प्रतिनिधि )महाराष्ट्र राज्यची “आपत्कालीन मोफत वैद्यकीय 108 रुग्णवाहिका ही सेवा 2014 पासून चालू आहे. रुग्ण वाहिका चालक या सेवेत 2014 पासून कार्यारत असून, तुटपुंज्या पगारात का
म करत आहोत. याबाबत आपल्या कर्यालयात देखील ईमेल द्वारे निवेदन पत्र पाठवले होते.

तसेच मा. आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देऊन BVG कंपनी कामगाराना तुटपुंज्या पगार देऊन शोषण करत असल्याच्या बाबत चर्चा केली असता, मा आरोग्य मंत्री साहेबांनी तात्काळ दि. 25/7/2023 रोजी मंत्रालय येथे BVG कंपनीचे CO संबंधित प्रोजेक्ट चे संचालक व प्रशासकीय अधिकारी व चालक यांच्या सोबत मीटिंग आयोजित केली होती. सदर मीटिंग मध्ये BVG कंपनीच्या आधिकर्यानी आरोग्य मंत्री सावंत साहेब यांना आम्ही वाहन चालक यांची मीटिंग घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करू असे अश्वाशीत करण्यात आले होते. परंतु महिना उलटून देखील आज पर्यंत कंपनीने आपल्या वाहन चालकाच्या मागण्यां बाबत कोणताही प्रकारे चर्चा केलेली नसून संघटनेने Bvg कंपनीला पुन्हा पत्र व्यवहार करून चालकांच्या मागण्यांसाठी मिटिंगचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती केली होती. तरी देखील कंपनीने कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. कर्नाटक व तामिळनाडू राज्यात हाच प्रकल्प राबवण्यात येत असून तेथील वाहनचालक यांना समान काम समान वेतना प्रमाणे 8 तास 30000 /- तर 12 तासाला 38000/- अशा प्रकारे वेतन देण्यात येत आहे.तर महाराष्ट्र राज्यात 12 तासासाठी 16 ते 19 हजार रुपयात राबवले जात
आहे.साहेब हे गोरगरिबांचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे न्यायाची दाद मागत आहोत. परंतु आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही आमच्या न्याय हाक्का साठी अखंड महाराष्ट्रात 01/09 /2023 पासून बेमुदत कामबंद आंदोलन व अमरन उपोषण करणार आहोत. त्यामुळे रुग्णाची हेळसांड व जीवित हानी जाल्यास BVG कंपनी व महाराष्ट्र शासन जवाबदार राहील. तरी साहेब आम्हाला न्याय मिळून द्यावा ही नम्र विनंती..