11वी-12 वीच्या अभ्यासक्रमात होणार महत्त्वाचे बदल – आता वर्षातून दोन वेळा होणार बोर्डाच्या परीक्षा.

0

24 प्राईम न्यूज 24 Aug 2023

  • शिक्षण मंत्रालय, 2024 पासून शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट आज तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.

📚 त्यानुसार आता 2024 च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे.

पहा काय बदल होणार

🖊️ शिक्षण मंत्रालयाने म्हटले की नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता 11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल, त्यापैकी किमान एक भारतीय भाषा अनिवार्य असेल.

📓 तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल.

  • नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता 11 वी आणि 12 वीमधील विषयांची निवड ‘स्ट्रीम’ पूर्ती मर्यादित राहणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

👉 तसेच वर्गखोल्यांमध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम संपवण्याची प्रथा यामुळे संपुष्टात येईल. याशिवाय पाठ्यपुस्तकांच्या किंमती कमी होतील, असेही शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!