समाजाभिमुख ‛साथी’ गुलाबराव अनंतात विलीन !

अमळनेर (प्रतिनिधि)खान्देशची मुलुख मैदान तोफ तथा साथी गुलाबराव पाटील यांच्यावर २३ रोजी दुपारी ३ वाजता दहिवद गावी त्यांच्याच शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुलाबरावांवर सानेगुरुजींच्या विचारांचा प्रभाव असल्याने खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अमळनेर तालुक्याचे माजी

आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे २२ रोजी निधन झाले. २३ रोजी सकाळी सात वाजता गुलाबराव पाटील यांचे पार्थिव सानेगुरुजी शाळेच्या

प्रांगणात मुख दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील ,माजी आमदार स्मिता वाघ , जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ऍड संदीप पाटील , उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अर्बन बँक चेअरमन मोहन सातपुते ,रिटा बाविस्कर ,ग्रंथालय सेल चे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील , यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनतर सजवलेल्या ट्रॅक्टरवर त्यांचे पार्थिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , सानेगुरुजी पुतळा , सुभाष बाबू पुतळा , हुतात्मा स्मारक ,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,पैलाड मार्गे दहिवद येथे आणण्यात आले. त्यावेळी सानेगुरुजींच्या गीते आणि प्रार्थना स्पीकर वर वाजवण्यात येत होते. दहिवद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा जयवंतराव यांनी अग्निडाग दिला.
गुलाबराव पाटील राजकारणी तथा समाजकारणी होते. सर्वसामान्य शेतकरी ,कामगार ,सामान्य माणसाविषयी बांधिलकी ,गरिबांविषयी कळवळा असणारा माणूस होता. वाईटला वाईट म्हणण्याचे धैर्य आणि चांगल्याला चांगले म्हणण्याचे औदार्य त्यांच्यात होते. अशा भावना अनेकानी व्यक्त करून त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील ,माजी आमदार डॉ बी एस पाटील , माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,माजी आमदार शरद पाटील ,माजी आमदार नाना बोरस्ते , माजी आमदार दिलीप वाघ , माजी आमदार संभाजी पाटील , माजी आमदार रमेश चौधरी , खान्देश शिक्षण मंडळ चेअरमन डॉ अनिल शिंदे , बाजार समिती सभापती अशोक पाटील , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी ,जेष्ठ पत्रकार गो पि लांडगे , महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष अविनाश पाटील , लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे , पोलीस निरीक्षक वासुदेव देसले , शिवसेनेचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , धरणगाव चे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी ,उपमुख्यधिकारी संदीप गायकवाड , यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व क्षेत्रातील मान्यवर हजर होते. सूत्रसंचालन रणजित शिंदे ,अनिल शिसोदे यांनी केले.