अमळनेर शहरात भगवान झुलेलाल चालिया उत्सव उत्साहात साजरा..

अमळनेर( प्रतिनिधि) अमळनेर शहरात भगवान झुलेलाल चालीया उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला.झुलेलेलाल चालीया साहेबांचा उत्सव दरवर्षी 16 जुलै रोजी सुरू होतो आणि 24 ऑगस्ट रोजी संपतो, दरम्यान, 8:00 वाजता आरती, भजन कीर्तन मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला, आठ, दहा दिवस अनेक कार्यक्रम उत्साहात मनोरंजन केले गेले
प्रत्येक शनिवार आणि रविवार लहान मुले आणि मातांनी विविध प्रकारचे मनोरंजन ठेवले होते
आणि
14/15 ऑगस्टला लावी कमल संघ उदयचंद यांचा कार्यक्रम होता
18 ऑगस्ट रोजी रात्री 10:00 वाजता फॅशन शो व नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता
२१ ऑगस्ट कौन बनेगा करोडपती प्रेरित कौन बनेगा स्मार्ट सिंधी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला
22 ऑगस्ट 108 विविध पदार्थ तयार करून भगवान झुलेलालला अर्पण केले गेले
23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:00 वाजता सामुहिक जाणते सर आणि रात्री भागवत पुराण कथा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.
24 ऑगस्ट रोजी समारोपाच्या दिवशी पहाटे झुलेलाल भगवान यांचा पंचामृत स्नान अभिषेक दुपारी 2:00 वाजता मटकी मिरवणूक काढण्यात आली या मध्ये सर्व सिंधी समाजातील माता-भगिनी, आबालवृद्ध, मोठ्या संख्येने सहभागी झाले समाजाचा गौरव आणि रात्री ८:०० वाजता भंडारा मोठ्या थाटामाटात केला गेला अशा प्रकारे आपल्या अमळनेर मध्ये झुलेलाल भगवान चालीसा साहिब मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला गेला
हे संपूर्ण 40 दिवस भगवान झुलेलेलालच्या चालिया साहिब आणि कार्यक्रम महाराज स्वामी गोपीचंद जी शर्मा, संजय शर्मा आणि प्रकाश जगयानी यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले आणि हे 40 दिवस कार्य झुलेलेलाल मंदिर टीमचया सहकार्याने दोस्ती ग्रुप आणि झुलेलाल लेडीज ग्रुप
आणि संपूर्ण समाजातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते अशा प्रकारे भगवान झुलेलाल उत्सवाची सांगता करण्यात आली.