श्रीमती केवळाबाई राजधर पाटील यांचे दुःखद निधन..

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर येथील न्यू प्लॉट भागातील रहिवासी तथा आर.के.पटेल उद्योग समूहाचे उद्योगपती स्वर्गीय आर.के.दादा पाटील यांच्या धर्मपत्नी श्रीमती केवळाबाई राजधर पाटील वय 87 यांचे वृद्धपकाळाने काल दि.24 रोजी दुपारी 4.40 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज 25 रोजी सकाळी 11.30 वाजता न्यू प्लॉट येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार असून उद्योगपती भास्कर राजधर पाटील, विनोद राजधर पाटील, वसंत राजधर पाटील, अशोक राजधर पाटील यांच्या त्या मातोश्री आणि सुरेश नारायण पाटील, प्रविण साहेबराव पाटील, कल्याण साहेबराव पाटील यांच्या काकू होत्या.