“मला कधी कधी अजित पवारांची दया येते”! -माजी राज्यपाल भगसिंह कोश्यारी पुन्हा उपरोधिक वक्तव्य.

0

24 प्राईम न्यूज 27 Aug 2023 वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा उपरोधिक वक्तव्य केले आहे. “मला कधी कधी अजित पवारांची दया येते. ते अतिशय हुशार आहेत. त्यांच्याकडे चांगला जनाधार आहे. संघटनेत त्यांची ताकद आहे. त्यामुळे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्याबरोबर असतात. पण, अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते तयार असतात,” असा उपरोधिक टोलाही कोश्यारी यांनी लगावला आहे.

भगतसिंह कोश्यारी यांना एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल प्रश्न विचारण्यातआला. यावर कोश्यारी म्हणाले, ” अजित पवारांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आपल्या उत्तराखंड मध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही • वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात.” कोश्यारी म्हणाले, “शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजही सर्वजण शरद पवारांचा आदर करतात. व्यक्तिशः मी त्यांचा खूप आदर करतो. शरद पवारांना दोन विद्यापीठांची पदवी माझ्या हातून देण्याची संधी मिळाली. ते उत्तम राजकारणी आहेत,” अशा शब्दांत कोश्यारी यांनी शरद पवार यांचे कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!