लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे जिल्हास्तरीय “आदर्श क्रिडा मुख्याध्यापक” पुरस्काराने सन्मानित..

0

,

अमळनेर ( प्रतिनिधी )

लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांना जळगाव जिल्हा क्रीडा महासंघातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये मार्गदर्शन केले व जिल्हास्तरावर क्रिकेट, बुद्धिबळ अशा विविध खेळांमध्येविद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्हास्तरीय मुख्याध्यापक आदर्श क्रीडा पुरस्कार देण्यात आला जळगाव येथे नुकताच कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मनोहर महाजन व प्रविण पाटील उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी आणि व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!