आबासो.व.ता. पाटलांच्या समृत्यर्थ अमळनेरला आयोजित
मोफत महा आरोग्य शिबीरात १ हजार ४८८ रुग्णांची तपासणी
आवश्यकतेनुसार गरजूंना गोळ्या – औषधीही वाटप..

अमळनेर (प्रतिनिधि) आबासो.व. ता.पाटील यांच्या तृतिय पुण्य स्मरणार्थ अमळनेरला विघनहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शनिवारी आयोजित मोफत महा आरोग्य शिबीरात १ हजार ४८८ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. आवश्यकतेनुसार गरजूंना गोळ्या-औषधी मोफत देण्यात आल्या.
धुळ्याचे शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी सांगितले की, माझे एक रखडलेले काम
केवळ व.ता.आबांमुळे मार्गी लागले होते.आपल्या भागातील अनेकांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणे न परवडणारे असते. आजच्या आयोजकांनी या महाशिबीरातून संधी उपलब्ध करुन दिल्याने गरीबांना शक्य करुन दिल्याबद्दल सदेच्छा दिल्या.
दीप प्रज्वलन करीत राष्ट्रीय शिक्षण धोरण संचालक डॉ.धनराज माने यांनी या शिबीराचा आरंभ केला. ते विनोदाने म्हणाले गेल्यावेळी मी पुन्हा येईल असे घोषित केले होते. तेंव्हा उच्च शिक्षण संचालकपदी होतो. आज पदोन्नतीवर आहे. केवळ आरोग्य तपासणी हे शिबीर नाही; यातून गरजू, गरीब काही रुग्णांना गोळ्या- औषधी देखील मोफत दिले जाणार, ही मोठी गोष्ट आहे. आता डॉक्टरांना असल्या शिबीरांसाठी यायला वेळ मिळत नाही. आयोजकांनी आज तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून त्यांच्याकडून आरोग्य तपासणी करुन घेतली. डॉ. श्रीकांत पाटील यांनी अमळनेरला महिन्यातून १ व्हिजीट द्यायचे घोषित केले आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो व शुभेच्छाही देतो. डायबेटालॉजीस्ट डॉ.ज्योती पाटील यांच्या कार्यसेवेचेदेखील त्यांनी कौतुक केले. डॉक्टरांनी आजची प्रॅक्टिस थांबवून या शिबीरात योगदान दिले, ते अमुल्य आहे.
प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ऑनलाईन संपर्क साधीत संवाद साधला.ते म्हणाले माझ्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याचने मला आजच्या शिबिराचला उपस्थित राहता आले नाही. मी दिलगीर आहे. पुढे मात्र नक्की येईन असा शब्द देत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
अतिथींचे स्वागत दै.पुण्य प्रताप चे मुख्य संपादक विवेक भाऊसाहेब तसेच सयाजीराव आणि डॉ. श्रीकांत पाटील, निवेदिता पाटील या भावंडांनी केले.
विचार मंचावर प्रा.अशोक पवार, साहेबराव चव्हाण, जिजाबराव पाटील, सदानंद अहिरराव हे देखील उपस्थित होते. यावेळी कमलताई माने, जे.एम. आबा, संजय कौतीक, हे देखील उपस्थित होते.
जय ऋतुकमल हॉस्पिटल आणि आय सी यु मुंबई संचलित विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अमळनेर तसेच दै.पुण्य प्रताप परिवार शिवाजी शि.प्र. मं. चुंचाळे आणि जय दुर्गा फाऊंडेशन, मारवड यांच्या संयुक्तमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
डायबेटीस,ह्रदय विकार, स्त्री रोग, अस्थिरोग, मूत्र विकार फुप्फुस, आतड्यांचे आजार, त्वचा रोग, दंत रोग, मेंदू विकार यांच्या आवश्यकतेनुसार तपासण्या इसीजी काढण्यात आले.
डॉ.श्रीकांत पाटील, डॉ.ज्योती पाटील, डॉ. दिपक अहिरे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. जितेंद्र निकुंभ, डॉ. सौरभ निकुंभ, डॉ.निखिल शिरोडे, डॉ. दिकपाल जाधव, डॉ.टी.डी.चव्हाण, डॉ.मनिष चव्हाण, डॉ.कौस्तुभ वानखेडे, डॉ. महेंद्र चव्हाण, डॉ. ज्योती चव्हाण,डॉ. विनिता चव्हाण या तज्ज्ञ डॉक्टरांकरवी रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबीराच्या यशस्वीतेसाठी बबलू दादा, रविंद्र ठाकूर, रावसाहेब पाटील, भाऊलाल देवरे, प्रा.योगिता पाटील, निवेदिता पाटील, प्रा.प्रशांत पाटील आदिंनी सहयोग दिला.
सूत्रसंचलन आनंदसिंग पाटील यांनी केले. आभार व्यक्त करतांना डॉ.ज्योती पाटील यांनी सांगितले की, आबासो.व.ता.पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वसा आम्ही चालवत राहू व त्यांना आनंद वाटेल असे उपक्रम हमेशा राबवित राहू, अशा शब्दांत आबांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.