एनडीएमधील चार पक्ष इंडियात सामील होणार. नितीश कुमार यांचा दावा

24 प्राईम न्यूज 28 Aug 2023 भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मधील चार घटक पक्ष निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये सामील होणार असल्याचा दावा काँग्रेस तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे.
नितीश कुमार म्हणाले, “मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी आणखी काही राजकीय पक्ष आघाडीत सामील होणार आहेत. यात भाजपसोबतच्या एनडीएतील चार पक्ष आहेत.” नितीश कुमार यांनी भाजप विरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांनी नव्याने सामील होणाऱ्या पक्षांची नावे जाहीर केली नाहीत.
नितीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, मुंबईत होणाऱ्या आगामी बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीच्या रणनीतीवर चर्चा केली जाईल. जागा वाटप व अन्य मुद्यांवर चर्चा केली जाईल. आणखी काही पक्ष आघाडीत सामील होत आहेत.