हे आहेत खजूर खाण्याचे फायदे

24 प्राईम न्यूज 28 Aug 2023
खजुरात जास्त प्रमाणात पोषणमूल्ये असल्याने आहारात याचा समावेश असावा असे महटले जाते. विशेषतः लहान मुले आणि महिलांनी खजूर खाल्ल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. खजुरात ‘अ’, ‘ब’, “क’ जीवनसत्व आणि लोह असते. खजुरामुळे आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजुराला पूर्ण अन्न म्हटले जाते. वजन कमी असलेल्या लहान मुलांना रोज २ खजूर खाण्यास द्यावे, खजुरामध्ये प्रमाणावर डाएटरी फायबर उपलब्ध असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत
होते. तसेच पचन देखील उत्तम राहण्यास मदत होते. ■ खजुरामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असल्याने
हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यास खजूर अतिशय उपयुक्त असतात. खजुरात कैल्शियम जास्त प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
एखादवेळी शरीरातील ताकद अचानक कमी झाल्यासारखे वाटल्यास दोन ते तीन खजूर खावेत. खजुरात ग्लुकोज असल्याने एकदम तरतरी येते. ■ खजुराच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.
खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चे हऱ्यावर तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी
होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते. ■ खजुरात व्हिटॉमन आणि प्रोटीन जास्त असतात. हे दोन्ही घटक शरीरासाठी अतिशय आवश्यक असतात. त्यामुळे बारीक असणाया व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढण्यास मदत होते.