चंद्रावर घराचेही आश्वासन देतील – उद्धव ठाकरे.

24 प्राईम न्यूज 28 Aug 2023
निवडणुकीच्या काळात येत्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रयान पाठविल्याचे श्रेय घेत चंद्रावर घरे देण्याचे आश्वासन देऊ शकतात, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ‘फडतूस’, ‘कलंक’, ‘थापाड्या’ म्हणणार होतो, पण म्हणणार नाही, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तिरकस शब्दांत टीका केली. ‘इंडिया’ला नावे ठेवणाऱ्यांना ‘घर्मेडिया’ म्हणू शकतो, असे ठाकरे म्हणाले.