रेशन चा गहू तांदूळ काळयाबाजारात विकण्याचा प्रयत्न, डीवायएसपीसी च्या पथकाने छापा टाकून पकडला. ९ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त.

अमळनेर (प्रतिनिधि)तालुक्यातील मंगरूळ येथील एम आय डी सी मध्ये रेशन चा गहू तांदूळ खरेदी करून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यावर डीवायएसपी च्या पथकाने छापा टाकून ट्रक सह तांदूळ , गव्हाच्या गोण्या असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसीतील लक्ष्मी फूड प्रोसेसर मध्ये व्यापारी अथर्व प्रदीप डेरे वय २२ हा रेशन चा तांदूळ आणि गहू खरेदी करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नांत असल्याची गोपनीय माहिती डीवायएसपी सुनील नंदवाळकर याना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील , पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,प्रकाश चव्हाण ,भटूसिंग तोमर , प्रमोद बागडे याना बोलावून छापा टाकण्यास सांगितले. २८ रोजी दुपारी पोलिसांनी छापा टाकला असता ट्रक एम एच ०४ ,जे यु ८८४७ खाली करत असताना दिसून आल्याने पुरवठा निरीक्षक संतोष बावणे यांना पंचनाम्यासाठी बोलावण्यात आले. त्यावेळी गाडी मध्ये ३ लाख ९४ हजार रुपये किमतीच्या १९७ गोण्या त्यावर छत्तीसगड राज्य सहकारी विपणन संघ , तर ४५ हजार रुपये किमतीच्या ४५ गोण्या त्यावर मध्यप्रदेश स्टेट सिव्हिल सपल्लाइज कार्पोरेशन असे नाव व लोगो छापलेले दिसून आले. पोलिसांनी या गोण्या आणि ५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या अहवालावरून भटूसिंग तोमर यांच्या फिर्यादीवरून अथर्व प्रदीप डेरे वय २२ रा पवन चौक ,१२ नंबर शाळेसमोर अमळनेर व किशोर वासुदेव पाटील वय ४२ रा मजरेहोळ ता चोपडा यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.