नवाब मलिक यांना आणखी एक दिलासा, काय कारण?

24 प्राईम न्यूज 30 Aug 2023 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. हमीदार सादर करण्यासाठी न्यायालयाकडून नवाब मलिक यांना वाढीव एक महिन्यांची मुदत मिळाली आहे. १४. ऑगस्ट रोजी नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. दोन महिन्यांसाठी ते जामीनावर आहेत. त्यानंतर आता त्यांना सत्र न्यायालयाकडून आणखी मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात २३ फेब्रुवारी २०२२ रोजी ईडीने अटक केली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील है। प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. याप्रकरणात प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षांनंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. मनी लॉन्डिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयने अटक केली होती.