पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन मंजूर.

0

24 प्राईम न्यूज 30 Aug 2023. तोशखाना प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या शिक्षेस स्थगिती देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. पाकिस्तानमधील जिल्हा सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात ५ ऑगस्ट रोजी ३ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्यांना लाहोरमधल्या जमान पार्क येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून इम्रान खान अटक येथील तुरुंगात कैद आहेत. न्यायालयाने इम्रान खान यांना १ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला होता, तसेच त्यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, इम्रान खान यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, तुरुंगातून बाहेर पडल्यावर इम्रान खान यांना दुसऱ्या कुठल्या प्रकरणात पुन्हा कैद केले जाऊ नये. मात्र खान यांच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत, ज्यापैकी दोन प्रकरणे अशी आहेत, ज्यामध्ये तपास यंत्रणा इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!