वैवाहिक वाद चे समुपदेशन वेळी नातेवाईकांची झाली बाचा बाची..
-मनीयार बिरादरी कार्यालयाचे नुकसान होऊन बिरादरीचा सदस्य किकोळ जखमी .

जळगाव ( प्रतिनिधी )
बिरादरीच्या रथ चौक जळगाव येथील कार्यालयात तडजोड समिती च्या केस क्रमांक २५००/२३ चे गेंदालालमील जावेद शेख व उस्मानिया पार्क येथील सुमैय्या बी यांच्या वैवाहिक वाद सोडवण्यासाठी सुरू असलेल्या समुपदेशन प्रकरणी दोघां चे नातेवाईकांमध्ये गैरसमजुतीच्या आधारे वादविवाद झाल्याने बिरादरीच्या कार्यालयाच्या आत व बाहेर उभे असलेल्या नातेवाईका मध्ये
वादविवादाचे पर्यावसन हाणामारीत झाले त्यामुळे बिरादरीच्या कार्यालयाच्या समोरील काच फूटली व त्यात बिरादरी चे सदस्य जूलकरनैन यांना किरकोळ दुखापत झाली.
शानिपेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धारबळे साहेब यांना दूरध्वनी द्वारे कल्पना दिली असता त्यांनी त्वरित सहकाऱ्यांसोबत येऊन रस्त्यावर आपसात जे भानगडी करत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अशी माहिती जळगाव जिल्हा मनीयार
बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी दिली आहे..