रक्षाबंधनाचे औचीत्त साधत नागरिकांना राखी बांधत हेल्मेट व सीट बेल्ट बाबद परबोधन व जनजागृती. धुळे पोलिसांचा अनोखा उपक्रम.

धुळे (अनीस खाटीक )
मा.श्री रविंद्र सिंघल साहेब ,अपर पोलीस महासंचालक (वा) म. रा. मुंबई,यांच्या संकल्पनेतून व मा पोलीस अधिक्षक श्री.अरविंद साळवी साहेब वाहतूक पोलीस मुख्यालय म.रां मुंबई तसेच मा.पोलीस अधीक्षक

श्री डॉ मोहन दहीकर सर महामार्ग पोलीस विभाग ठाणे, ठाणे मा.पोलीस उप अधिक्षक श्री प्रदीप मैराळे सर, नाशिक विभाग नाशिक यांचे मार्गदर्शन नुसार मा.पोलीस निरीक्षक श्री हेमंतकुमार भामरे सर धुळे भाग यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शन नुसार महामार्ग 3 वरील चाळीसगाव चवफुली येथे रक्षाबंधन निमीत्त हेल्मेट

परिधान केलेले व न केलेले दुचाकी चालक व सीट बेल्ट लावलेले व न लावलेले फोर व्हीलर चालक यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र धुळे कडील पोलीस अधिकारी/ अमलदार यांनी राखी बांधून त्यांना नियमित वाहतुक नियमांचे पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवता येईल, नियमित हेल्मेट घालण्याचे व चार चाकी चालवताना सीट बेल्ट लावण्याबाबत मार्गदर्शन करून एक राखी सुरक्षेसाठी बाबतचा संदेश देऊन, सन्मानपूर्वक त्यांना राखी बांधून प्रबोधन व जनजागृती करण्यात आली आहे व धुळे लळिंग टोलनाका,सोनगीर टोल नाका येथे ही प्रबोधन करणेत असेल आहे.