विज्ञान विभागाच्या वतीने प्रताप महाविद्यालयात श्रद्धांजलीपर कार्यक्रम.

अमळनेर (प्रतिनिधि )येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागाचे माजी प्रा. यशवंत दिगंबर नाडकर्णी यांचे दि.२५ ऑगस्ट रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने दि. २८ रोजी त्यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत प्रा. यशवंत नाडकर्णी यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
याप्रसंगी पदार्थ विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख तथा माजी प्राचार्य डॉ. अ. गो. सराफ, प्रा. डॉ. उदय देशपांडे, (रसायनशास्त्र विभाग), प्रा. एस. डी. ओसवाल, प्रा. एम. एस. बडगुजर (कनिष्ठ महाविद्यालय रसायनशास्त्र विभाग), प्रा. एस. जी. अग्निहोत्री (पदार्थ विज्ञान कनिष्ठ विभाग), प्राचार्य डॉ. ए. बी.जैन, माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी, तत्कालीन शिक्षकेतर कर्मचारी रतिलालशेठ भावसार, प्रा.डॉ. अमित पाटील, प्रा.डॉ. एस. डी. बागूल, प्रा. नितेश कोचे, डॉ. प्रियंका पाटील, प्रा. प्रियंका बोरसे, प्रा. संदीप नेरकर, प्रा. उन्मेष जाधव, प्रा. डॉ. चित्रा मलेला व विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. ए. बी. जैन व पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयंत पटवर्धन हे प्रा. यशवंत नाडकर्णी यांचे शेवटच्या बॅचचे विद्यार्थी होते.