रायबरेलीत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस आदिती सिंह सोनिया गांधींशी भिडणार.

24 प्राईम न्यूज 31Aug 2023
नवी दिल्ली : काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीत आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा सामना पहायला मिळणार आहे. कारण पूर्वाश्रमीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे काँग्रेसच्या सर्वेसर्वा यांच्याशी लढत देणार आहेत या वेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची टक्कर पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेस नेत्या पण आता भाजपमध्ये स्थिरावलेल्या आदिती सिंह यांच्यासोबत होणार आहे. ही लढत खूपच रंगतदार होण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय विश्लेषकांसोबत सर्वसामा- न्यांची उत्सुकता वाढली आहे.