एरंडोल नगरपालिकेतर्फे रस्त्यावर अतिक्रमण करून दुकान थाठणाऱ्या विक्रेत्यांना दिल्या नोटीसा.

0


प्रतिनिधी (कुंदन ठाकुर) एरंडोल येथील आठवडे बाजारात भाजीपाला विकणाऱ्या, लोडगाडी तथा इतर दुकाने राज्य महामार्ग,नगरपालिका सार्वजनिक वापरचा रस्ता यावर दुकाने लावून वाहतुकीस अडथळा आणल्या बाबत नोटीस बजावण्यात आल्या.
नोटीस मध्ये वेळोवेळी समक्ष दिलेल्या सूचना च्या आधारे नगरपालिका हद्दीतील आठवडे बाजार लगत,राज्य महामार्ग नगरपालिका सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर भाजीपाला दुकाने,लोडगाडी इतर दुकाने लावून वाहतुकीस अडथळा करीत असल्याचे म्हटले असून सदर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते प्रसंगी या दुकानांमुळे अथवा वाहनामुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानी होऊ शकते व त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल असे म्हटले आहे शेवटी राज्य महामार्ग नगरपालिका सार्वजनिक वापर चा रस्ता यावर दुकाने लावू नये अन्यथा नगरपालिकेमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल तुम्ही स्वतः जबाबदार रहाल याची गंभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.याप्रसंगी मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आर.पाटील,विनोद पाटील,वैभव पाटील,विनोद जोशी,रघुनाथ महाजन,दिपक पाटील, भरत महाजन,आशिष परदेशी आदी नोटीस बजावत आहे.
दरम्यान याबाबत एरंडोल नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी आठवडे बाजारातील दुकानदारांना नवीन आठवडे बाजाराच्या ठिकाणी जागा आखून दिलेली असून प्रत्येकाच्या नावासमोर त्यांनी त्यांच्या सह्या देखील केलेल्या आहेत असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!