एरंडोल तालुका औषध विक्रेता संघ अध्यक्षपदी सतीश पाटील-सचिवपदी गुणवंत पाटील बिनविरोध

एरंडोल ( प्रतिनिधि) येथील एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेची सभा नुकतीच तालुकाध्यक्ष कैलास न्याती यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सतीष सुदाम पाटील यांची एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटेच्या तालूकाध्यक्षपदी एकमताने मंजूरी देत निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वऋत्र अभिनंदन होत आहे.
तालुका अध्यक्ष कैलास न्याती यांचा कार्यकाळ संपल्याने सन 2023-2026 साठी तालुकाध्यक्षपदी स्वामी मेडिकलचे संचालक सतीश पाटील तर तालुका सचिवपदी कासोद्याचे न्यू लक्ष्मी मेडिकलचे संचालक गुणवंत पाटील यांची जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. त्याला उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. तसेच माजी अध्यक्ष कैलास न्याती यांची जळगाव जिल्हा औषध विक्रेता संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी केली. सभेला तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी सतीश पाटील, मनोहर पाटील, महेश पाटील, गुणवंत पाटील, नितीन शिंपी, नितीन पाटील, योगेश बियाणी, ललित पाटील. भूषण पाटील यांचेसह सभासद बांधवांनी परिश्रम घेतले. बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष सचिव तसेच सर्व कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर यांनी अभिनंदन केले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आभार कैलास न्याती यांनी मानले. नवनियुक्त अध्यक्ष सतिष पाटील, सचिव गुणवंत पाटील आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य कैलास न्याती यांचे अभिनंदन,