एरंडोल वाल्मिकी समाजातर्फे जहावीर गोगाजी नवमी निमित छडी मिरवणुकीचे भव्य आयोजन..

.
प्रतिनिधी (कुंदन ठाकुर) एरंडोल येथील वाल्मिकी मेहतर समाज व समस्त सकल पंच तर्फे समाजाचे आराध्य दैवत जहावीर गोगाजी चव्हाण नवमी निमित्त त्यांच्या छाडींची शहरात भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जहावीर गोगाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी जळगाव शहरातील तिन,अमळनेर शहरातील दोन छाड्यांची शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली.सदर मिरवणुकीस रामदेवजी बाबा नगर मरिमाता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली व शहरातील प्रमुख मार्गांनी मिरवणुक काढण्यात आली.सदर मिरवणुकीचे प्रथम वर्ष असल्याने समाजात प्रचंड उत्साह दिसुन आला.मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. छाड्या आकर्षक पद्धतीने सजवलेल्या होत्या व सर्वांना आकर्षित करीत होत्या.मिरवणुक शांततेत व शिस्तबध्द पाडण्यासाठी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन,माजी नगरसेवक प्रा.मनोज पाटील,नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे,समाजाचे सरपंच फकिरा खोकरे,माजी नगरसेवक बबलू चौधरी,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,माजी नगरसेवक पापा दाभाडे,माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे,सुरेश दाभाडे,युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख बबलू पाटील,मयूर महाजन,कृष्णा ओतरी,गोपाल महाजन,प्रा.आर.एस.पाटील,अमोल तंबोली,अशोक तंबोली,भिका खोकरे,प्रकाश सिरसे, हरचंद अठवाल,राजेश गोडाले,सुभाष सारसर, शाम गेचंद,कन्हैया पवार,सुनील खोकरे,ताराचंद अठवाल,युवराज खोकरे,धम्मा पहेलवान व असंख्य समाज बांधव तथा विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाल्मिकी मेहतर समाजा,समस्त सकल पंच,राम भैया गृप, पहेलवान पुत्र गृप व आनंदभाऊ दाभाडे मित्र परिवाराने परिश्रम घेतले.