शासकीय तंत्रनिकेतन ग्रंथालय इमारतीचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..

धुळे (अनीस खाटीक) धुळे शहरातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध इमारतीसाठी आ.फारुख शाह यांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी

आणला आहे तो एक रेकॉर्ड आहे त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत शिक्षण महर्षी दादासाहेब रावल शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात ग्रंथालय इमारत व आवार भिंतीचे बांधकाम करणे कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
धुळे शहरातील एमआयडीसी येथील विभागीय कार्यालय फायर स्टेशन आदिवासी प्रकल्प इमारत दारूबंदी कार्यालय जिल्हा परिवहन कार्यालय जजेस क्वार्टर, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन 200 खाटांचे बांधकाम, हिरे मेडिकल येथील वस्तीगृह बांधकाम यासाठी आ.फारुख शाह यांनी शासनाकडून शेकडो कोटीच्या निधी आपल्या प्रयत्नाने शहरासाठी उपलब्ध करून दिला आहे. आजपर्यंत शहराच्या विविध कार्यालय इमारतीसाठी रेकॉर्ड निधी आणण्याचे काम आ.फारुख शाह यांनी केले आहे. तसेच सर्व कार्यालय एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीचे काम सुद्धा लवकर सुरू होणार आहे. या सर्व कामाच्या एक भाग म्हणून आज आ.फारुख शाह यांच्या हस्ते शासकीय तंत्रनिकेतन येथे ग्रंथालय व आवार भिंतीचे कामाचे शुभारंभ करण्यात आला. यावेळेस आ.फारुख शाह यांचेसोबत परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व शासकीय तंत्रनिकेतन येथील प्राचार्य डॉ.वाडेकर,के.आर.पवार,डॉ.अन्सारी,इतर शिक्षक वृंद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील,उपअभियंता किरण पाटील,राहुल माळी, शहेबाज शाह,नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक गनी डॉलर,नगरसेवक आमिर पठाण,डॉ. दीपश्री नाईक,डॉ.बापुराव पवार ,आसिफ शाह,प्यारेलाल पिंजारी,निजाम सैय्यद,कैसर अहमद,नजर पठाण,अकीब अली, माजिद पठाण,जीड्डया पहिलवान,सिराज मलिक,अजहर सय्यद,शहजाद मंसूरी,शाहरुख कुरेशी,मोईन शेख,साकीब शाह,जुबेर शेख,समीर शाह ,नदीम मिर्झा,मुजाहीद बागवान,साजिद शाह आदी उपस्थित होते