पाऊसा साठी इस्तेसका नमाज चे रविवारी आयोजन. –मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधी )
अनेक दिवसा पासून जळगाव व इतरत्र पाऊस नसल्याने संपूर्ण मानवजात हवालदिल झाली असून पाऊस पडावा म्हणून जळगाव शहरात नमाज ए इस्तेसका चे आयोजन दि 3 सप्टेंबर, रविवारी रोजी सकाळी 9 वाजता ईदगाह मैदान,अजिंठा चौक,जळगाव येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या नेतृत्वात करण्याचे ऊलमा काऊन्सिल ने ठरवले आहे.
तरी संपूर्ण जळगाव वासियांनी आपल्या कडे असलेली जनावरा सह सकाळी 8.45 वाजता इदगाह मैदानावर उपस्थीत रहावे असे आवाहन शहर ए काझी मुफ्ती अतीकुर रहेमान, इदगाह ट्रस्ट चे अध्यक्ष वहाब मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.