दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम – विजय वडेट्टीवार

24 प्राईम न्यूज 1 Sep 2023 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून फाईल आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार नाहीत. तर त्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील व नंतरच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जाणार आहेत, अशी चर्चा आहे. अजित पवार यांचे या माध्यमातून पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दादांच्या (अजितदादा) दादागिरीला भाईंचा (मुख्यमंत्री शिंदे) लगाम, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
अजित पवार मंत्रिमंडळात येऊन दोन महिने झाले नाहीत, पण त्यांच्या दादागिरीने आता ठाण्याच्या भाईना मैदानात उतरावे लागले. कोणत्याही फाईली, विशेषतः वित्त विभागाने नाकारलेले प्रस्ताव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांना नक्कीच कळलं असेल एखाद्याला जेवायला आपले ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये,’ असे विजय वडेट्टीवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.