लग्नाची भोजनावळी व दहेज प्रथेला पूर्णपणे फाटा देत जळगावकरानी भुसावळ येथे केला अनोखा विवाह.

जळगाव ( प्रतिनिधी )
जळगाव येथील बासिद शेख हे आपल्या मुलासाठी भुसावळ येथील रहमान खान यांच्या घरी गेले असता त्यांना रोशन जहा ही मुलगी आपला मुलगा नावे शहजाद अहमद यासाठी पसंत पडल्याने भुसावळ येथील अन्नू भाई यांनी मध्यस्थी करत दोघी पार्टी ही ओळखीची व जवळची असल्याने तसेच मुलाने व मुलीने एकमेकास पसंत केल्याने याच ठिकाणी लग्न लावून घ्यावे असा प्रस्ताव ठेवताच जळगावचे जमील पठाण, साजिद शेख, शहजाद शेख, अनिस शहा, जाहीद शेख व यावलचे असद खान यांनी यास अनुमोदन दिले व हा निकाह मिल्लत नगर,भुसावळ येथील मस्जिद ए किफायत उलूम मध्ये मुफ्ती नाझीम यांनी खुतब ए नीकाह वाचून निकाह लावला.
कोणत्याही प्रकारची लग्नाची भोजनावळी व दहेज प्रथेला या ठिकाणी पूर्णपणे फाटा देण्यात आला. वराने वधू हिस ११ हजार रुपये रोख मेहेर ची रक्कम अदा केली.
या विवाहाची चर्चा संपूर्ण जळगाव भुसावळ मध्ये होत असून या विवाहास व विवाह करणाऱ्यांना जळगाव शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो
वर शहजाद अहमद सोबत जमील पठाण, साजिद शेख, शहबाज शेख ,अनिस शहा, जहिद शेख आदी दिसत आहे