अमळनेर तालुका तलाठी संघाने निषेध करून काम बंद आंदोलन..

अमळनेर (प्रतिनिधि)यावल येथील महिला मंडळ अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर तालुका तलाठी संघाने निषेध करून काम बंद आंदोलन पुकारले आहे. प्रांताधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना तलाठी संघाने निवेदन दिले आहे.
यावल येथे महिला मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी. त्यामुळे आरोपींना अटककरण्यात येत नाही तोपर्यंत अमळनेर तालुका तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे.