इंडिया आघाडीच्या बोधचिन्हांचे अनावरण एक दोन दिवसात.

24 प्राईम न्यूज 2 Sep 2023 इंडिया’ आघाडीच्या तिसऱ्या बैठकीचे मुख्य आकर्षण ठरलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण लटकले आहे. आघाडीत नवे मित्रपक्ष जोडले गेल्याने त्यांचेही मत विचारात घेऊन बोधचिन्हावर एकमत केले जाणार आहे. त्यामुळे त्याचे अनावरण तूर्तास रद्द केले नसून ते पुढे ढकलले आहे. येत्या एक-दोन दिवसांत दिल्लीत मानचिन्हाचे अनावरण होईल, अशी शक्यता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला गुरुवारपासून मुंबईच्या ‘ग्रँड हयात’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरुवात झाली. आघाडीत नवे मित्रपक्ष जोडले गेल्याने त्यांचेही मत विचारात घेतले जाणार आहे. त्या पक्षातील नेत्यांना आघाडीच्या बोधचिन्हावर चर्चा करायची आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही वेळ दिलेला आहे,” असे राऊत म्हणाले. “इंडिया बैठकीचा अजेंडा खूपच भरगच्च आहे. अनेक विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या बोधचिन्हाचे अनावरण येत्या एक-दोन दिवसांत दिल्लीत होऊ शकते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.