जिल्हास्तरीय नेहरू हॉकी चषक हॉकी स्पर्धा.
दोन्ही गटात बियाणी पब्लिक भुसावळ विजयी तर एम आय तेली व बोहरा पारोळा उप विजयी.

0

जळगाव ( प्रतिनिधी)

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगावच्या माध्यमाने शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या नेहरू चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी जिल्हास्तरीय १५ वर्षा आ

तील मुले १७ वर्षातील मुले व मुली यांच्या स्पर्धा खेळवण्यात आले. दरम्यान १५ वर्षा आतील गटात अंतिम सामन्यात बियाणी पब्लिकने एम आय तेली भुसावळ संघाचा पेनल्टी मध्ये २-० ने पराभव केला तर १७ वर्षातील मुलींच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात बियाणी पब्लिक भुसावळ यांनी बोरा सेंट्रल स्कूल पारोळा यांचा ३-० ने पराभव करीत नेहरू चषक पटकावले.
विशेष प्रविण्याचे बक्षीस डॉ उल्ल्हास पाटील स्कूल भुसावळ मुलींच्या संघास देण्यात आले
१७ वर्ष आतील मुलांच्या स्पर्धा सुरू असून रविवारी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने होणार आहे.

विजय मुलं आणि मुली च्या बियाणी स्कूल सोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून
मजाज खान, लियाकत अली, अश्विनी पाटील, वर्षा सोनवणे, मीनल थोरात, फारूक शेख, डॉक्टर बाबुशेठ, अद्व्होकेट आमिर शेख, हिम्मत पाटील, सत्यनारायण पवार आदी दिसत आहे

उद्घाटन व पारितोषिक वितरण
या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आले तर पारितोषिक वितरण समारंभ उर्दू जुनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाबु शेख यांच्या हस्ते करण्यात आले. विजयी व उपविजयी संघास स्पोर्ट्स हाऊस व हॉकी जळगाव तर्फे देण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक मीनल थोरात, हॉकी जळगावचे लियाकत अली,वर्षा सोनवणे एडवोकेट आमिर शेख, सत्यनारायण पवार, इमरान बिस्मिल्ला, राष्ट्रीय खेळाडू श्रीमती अश्विनी पाटील आदी उपस्थित होते

स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे
१५ वर्षाआतील मुले
१)डॉ उल्हास पाटील भुसावळ वी वी डॉ. उल्हास पाटील सावदा (१-०)
उपांत्य सामना
२)एम आय तेली भुसावळ वी वी बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा (१-०)
३)बियाणी पब्लिक स्कूल वी वी डॉ उल्हास पाटील भुसावळ (३-०)
अंतिम सामना
४)बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ वी वी एम आय तेली स्कूल भुसावळ (२-१)
१७ वर्षातील मुली
१)ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ वी वी डॉ उल्हास पाटील स्कूल भुसावळ(१-०)
उपांत्य सामना
२)बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ वी वी डॉ उल्हास पाटील स्कूल सावदा (४-०)
३)बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा वी वी तापती पब्लिक स्कूल भुसावळ (४-१)
अंतिम सामना
४)बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ वी वी बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा (३-०)

स्पर्धेत पंच म्हणून लियाकत अली, मजाझ खान, चेतन माळी, दिवेश चौधरी, शाहेझाड मिर्झा, राज सोनवणे, हरीप्रकाश सैनी, दिनेश ओडिया, कृष्णा राठोड, साई पाटील यांनी काम केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!