पोलीस लाठीमार चा तीव्र निषेध व चौकशीची मागणी..
मुस्लिम मनीयार बिरादरी तर्फे..

जळगाव ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात शुक्रवारी पोलिसांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
ऊपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार केला एवढेच नव्हे तर गोळीबार केला त्या कृत्याचा जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी तर्फे तीव्र स्वरूपाचे निषेध करून धिक्कार करण्यात आला.
या आशया ची तक्रार वजा निवेदन जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, व राज्याचे पोलीस महासंचालक यांना ईमेल द्वारे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे
एस आय टी मार्फत चौकशी
या लाठीमार, गोळीबार ची चौकशी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थातच एसआयटी मार्फत करण्यात यावी व जो कोणी यास कारणीभूत असेल त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.