आज काँग्रेस जनसंवाद यात्रा अमळनेरात..

अमळनेर( प्रतिनिधि) आज अमळनेरात अमळनेर : राज्य काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित जनसंवाद यात्रा रविवार दि. ३ रोजी दुपारी ३ वाजता अमळनेरात येत आहे. यात आमदार कुणाल पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, यावलचे आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदी सहभागी होणार आहेत. सावखेडा, मुंगसे, रूंधाटी, मठगव्हाण, पातोंडा, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव, गांधली असा जनसंवाद यात्रेचा मार्ग असेल.