तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी झाली शोकसभा.

अमळनेर (प्रतिनिधी) स्वर्गीय गुलाबराव बापूंची आमदार असताना सभागृहात प्रश्न मांडण्याची शैलीच वेगळी असल्याने त्याची चर्चा आजही सभागृहात होते, या वेगळ्या शैलीमुळे त्यांचे नाव विधानसभेत अजरामर राहील अशी भावना मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

अमळनेर येथील माजी आमदार गुलाबराव बापू पाटील यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन सानेगुरुजी विद्या मंदिरातील एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील, प्रतिभा शिंदे, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, मुख्याध्यापक सतीश देशमुख, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, संचालक गुणवंतराव पाटील, ऍड अशोक बाविस्कर, अशोक बिऱ्हाडे यासह शिक्षक वृंद आणि पत्रकार बांधव यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रा असंख्य मान्यवर उपस्थित होते,यावेळी गुलाबराव बापूंच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार, नेता, कार्यकर्ता, वक्ता पुरस्कार दरवर्षी स्मृतिदिनी देणार तसेच त्यांचे विधानसभेतील भाषणांचे पुस्तक तयार करून उपलब्ध करून देणार अशी घोषणा युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने प्रा अशोक पवार यांनी केली.