लाठीचार्जचे हिंसक पडसाद मराठा आंदोलकांची अनेक ठिकाणी जाळपोळ, वाहने पेटवली.

24 प्राईम न्यूज 3 Sep 2023 जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचे शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी हिंसक पडसाद उमटले.
पोलिसांच्या कृतीचा निषेध करत राज्यभरात मोर्चे काढण्यात आले, तर काही जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ करत राज्य सरकारचाही निषेध केला. जालना शहरात रास्ता रोकोदरम्यान आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पुन्हा हवेत गोळीबार करत अश्रुधूर सोडला. औरंगाबाद जिल्ह्यात एका सरपंचाने स्वतःची नवी गाडी जाळून घटनेचा निषेध व्यक्त केला.