“आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांचे निलंबन व्हावे. -उदयनराजे भोसले

24 प्राईम न्यूज 3 Sep 2023
उदयनराजे भोसले यांनी शनिवारी अंतरवाली सराटी गावात जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जरांगे यांनी उदयनराजे यांना घटनेची माहिती दिली. त्यावर उदयनराजे यांनी त्यांना आंदोलन मागे घेऊन चर्चेने मार्ग काढण्याचे आवाहन केले. उदयनराजे म्हणाले, “आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांचे निलंबन व्हावे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. हे फार वर्षांपूर्वीच होणे अपेक्षित होते. अन्याय झाल्यानंतर असा उद्रेक होणे स्वाभाविकच आहे. माझी नुकतीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी भेट झाली. २-३ दिवसांत चर्चा करून पुन्हा त्यांची आंदोलकांशी भेट घालून देईल,” असे सांगत मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला.