लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? – उद्धव ठाकरे

24 प्राईम न्यूज 3 Sept 2023
राज्यातील दोन फुल, एक हाफ सरकारला आंदोलनाची कल्पना नव्हती का, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. जालना येथील घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला होता, याची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा नुसता निषेध करून चालणार नाही. आमची इंडियाची बैठक सुरू असताना एकाने पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे, पण राज्यात आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, याची यांना माहिती नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना राज्यात काय सुरू आहे, कुठे आंदोलन सुरू आहे, याची रोज माहिती मिळत असते. पण दोन फुल, एक हाफ सरकारला आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.