‘इंडिया’च्या बैठकीवरून लक्ष हटवण्यासाठी लाठीचार्ज. -शरद पवार

24 प्राईम न्यूज 3 Sep 2023 शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना बळाचा वापर का
केला, याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतंय शरद पवार म्हणाले, पोलिसांनी अचानक लाठीहल्ला सुरू केल्याने गावातील लोक तिथे जमा झाले. मोठ्या संख्येने लोक जमल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तसेच छऱ्यांचा मारा सुरू केला. शरीरात घुसलेले हे छरें शस्त्रक्रिया करून काढावे लागले. लोकांच्या अंगावर त्याच्या खुणा आहेत. पोलिसांनी या या निष्पाप नागरिकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली,” असा आरोपही पवार यांनी केला आहे.का पोलिसांनी लाठीहल्ल्या- वेळी लहान मुलं पाहिली नाहीत, स्त्रिया पाहिल्या नाहीत, वडिलधारे लोक पाहिले नाहीत, प्रत्येकावर लाठीहल्ला केला. त्यांनी हवा तसा बळाचा वापर केला. मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश देण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.