मी तुमच्या पाठिशी आहे. काहीही काळजी करू नका.. -राज ठाकरे.

24 प्राईम न्यूज 4 Sep 2023
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झालेल्या प्रकाराचा आधीच निषेध केला आहे. मनसेनेते बाळा नांदगावकर यांनी रविवारी मनोज जरंगे पाटील यांची उपोषणाच्या ठिकाणी जाउन भेट घेतली. बाळा नांदगावकर यांनी त्यावेळी मनोज जरंगे यांचा राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिला. राज ठाकरे यांनी मी तुमच्या पाठिशी आहे. काहीही काळजी करू नका असा शब्द दिला. लाठीमारात जखमी झालेल्या माताभगिनींचीतब्येत कशी आहे याची विचारपूसही राज ठाकरे यांनी मनोज पाटील यांच्याकडे केली. सरकारला जाब विचारला पाहिजे माता मुलांना का मारले. गोळया पण झाडल्या. आम्ही काय पाकिस्तानचे लोक आहोत का. लोकांवर गोळ्या झाडल्या. गुन्हे दाखल केले. निजाम, इंग्रजांच्या काळात पण असा अन्याय बघितला नव्हता, असे यावेळी मनोज जरांगे राज ठाकरे यांना म्हणाले.