जालना लाठीमाराचे तिसऱ्या दिवशीही राज्यभरात उमटले पडसाद.

0

24 प्राईम न्यूज 4 Sep 2023

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा
आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद
रविवारी तिसऱ्या दिवशीही राज्यभरात उमटले. राज्यात
ठिकठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या. मुंबईसह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. मराठा समाजासह काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी, रास्ता रोको करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पोस्टर्सना जोडे मारण्यात
आले. यावेळी सरकारचा तीव्र निषेधमनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, याकरता सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सरकारचा प्रस्ताव घेऊन गिरीश महाजन रविवारी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत नितेश राणेही होते. या दोघांनीही मनोज जरांगे यांची मनधरणी केली. परंतु मी मेलो तरी चालेल पण पाच कोटी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे मराठा
आरक्षणासंदर्भातील सरकारची आजची चर्चा निष्फळ ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!