मराठा समाजाला आरक्षण देणारच – मुख्यमंत्री.

24 प्राईम न्यूज 4 Sep 2023
मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भक्कम आणि टिकणारे आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हा माझा शब्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मराठा समाज शांतताप्रिय आहे, हे समाजाने ५८ मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. पण, या माध्यमातून कोणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ३३०० मराठा तरुणांना नोकरी देणारा हा एकनाथ शिंदेच होता, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भक्कम टिकणारे आरक्षण दिल्याशिवाय मी आणि सरकार स्वस्थ बसणार नाही, हा माझा शब्द आहे.