अंतरवाली सराटी मराठा मोर्चा  कार्यकर्त्यांवरील लाठीचार्ज चा एम.आय.एम.पक्षातर्फे जाहीर  निषेध.

0

       धुळे(अनीस खाटीक)
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले होते.आंदोलन सुरु केल्यानंतर

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचेशी संपर्क करून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती.मात्र त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.शुक्रवारी  प्रकृती खालावल्यामुळे पोलीस मनोज जरांगे यांना उपचारासाठी घेवून जात असतांना आंदोलकांनी विरोध केला.त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार आणि अश्रुधुराचा देखील उपयोग केला.या अमानुष लाठीचार्ज चा जाहीर निषेध धुळे जिल्हा एम.आय.एम.च्यावतीने करण्यात येत आहे.
       वरील सर्व घटनाक्रम लक्षात घेता सकृतदर्शनी पोलीस प्रशासनाने गंभीर चुक केल्याचे दिसून येते.मराठा मोर्चाचे कार्यकर्ते दि.२९ ऑगस्ट पासून शांततेने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असतांना पोलीस प्रशासनाने  त्याच दिवशी मोठा फौजफाटा गोळा करून ठेवला आणि अंतरवाली सराटीचा इतर गावांशी संपर्क तोडण्यात आला.यासंदर्भात कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता मुख्यमंत्री महोदय येणार आहेत अशी खोटी थाप मारण्यात आली.म्हणजे आंदोलन चिरडण्याची पोलिसांची  पुर्वनियोजित योजना होती.याचा सरळ सरळ अर्थ होतो कि जनतेने त्यांच्या न्याय हक्कासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन करू नये.
       महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमचे सरकार येवू द्या फक्त दोन महिन्यात मराठा आरक्षण देतो असे म्हणणारे भाजपाचे नेते सत्ता हाथात येवून सव्वा वर्ष झाले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही.हे अपयश झाकण्यासाठी तर आंदोलन चिरडण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न नाही ना ? असा सवाल या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत.जालना जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावात होणा-या आंदोलनासाठी  एवढ्या मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्ताची गरजच का ?भाजपाचे सत्ताधारी कायमच मराठा आरक्षणाबद्द्ल मराठा समाजाला गाजर दाखवत आलेले आहे.आणि याचा जाब विचारल्यावर लाठीचार्ज आणि आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातात.यापूर्वी सुमारे पाच वर्षांपुर्वी नवी मुंबईतील कामोठे येथे मराठा मोर्चा आंदोलकांवर कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यावेळी देखील राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस होते.आणि आता देखील राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीसच आहेत.यानिमित्तानेआंदोलक मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना जीवनातून उठवायचे हि संघ-भाजपाची  कुटील नीती  समोर आलेली आहे.
       या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करीत आहोत कि तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न  सोडवावा आणि मराठा आरक्षणाच्या बरोबरीने गेल्या काही वर्षांपासून धनगर आरक्षण आणि मुस्लीम आरक्षणासाठी देखील धनगर आणि मुस्लीम समुदाय संघर्ष करीत आहे.त्यामुळे धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे ही विनंती.
मागण्या -:
१)     मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे.
२)     जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज मधील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे.
३)     लाठीचार्ज करणारे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे.
४)     गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक युसुफ मुल्ला, नगरसेवक गनी डॉलर ,नगरसेवक सईद बेग मिर्झा  
नगरसेवक मुकतार अन्सारी,नगरसेवक आमिर पठाण
नासिर पठाण   मुख्तार अन्सारी                डॉ.दीपश्री नाईक फातेमा अन्सारी जिल्हअध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हाअध्यक्ष महिलाआघाडी   शहरअध्यक्ष महिलाआघाडी
        रफिक शाहआमीर पठाणअकिब अली
जिल्हाअध्यक्ष युथआघाडी          शहर अध्यक्ष युथआघाडी        जिल्हाअध्यक्ष विद्यार्थी  हमिद अन्सारी हालीम शमसुद्दिन माजिद पठान शहरअध्यक्ष विद्यार्थी आघाडी    जिल्हाअध्यक्ष सोशल मेडीया आघाडी    अध्यक्ष मालवाहतूक संघटना
निजाम सैय्यद, जिद्या पहिलवान, सउद सरदार,
माजी नगरसेवक साजिद साई,सलीम शाह,सलमान खान,शोएब मुल्ला,नजर खान,हलीम शमसुद्दिन,सायेदा अंसारी,अकिला शेख, महेमुना अंसारी,सलीम शाह,इब्राहिम पठाण,इकबाल शाह, आदींनी.
               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!