देवपूर ईदगाह मैदान येथे कुंपण भिंत आणि पेविंग ब्लॉक बसवणे कामाच्या शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न…

धुळे (अनिस खाटीक) धुळे शहरातील मूलभूत सुविधा च्या विकासा साठी आ.फारुख शाह यांनी करोडो रुपयांच्या निधी आणला तसेच शहरातील व जिल्ह्यातील धार्मिक स्थळाच्या विकासासाठी सुद्धा आ.फारुख शाह यांचे प्रयत्नांमुळे करोडो रुपयांच्या निधी आज पर्यंत

धुळे व जिल्हा साठी आमदार साहेबांनी आणलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून देवपूर ईदगाह मैदानाच्या कुंपण भिंत व सुशोभीकरणासाठी आणि पेविंग ब्लॉक बसवण्याच्या 50 लाख रुपये कामाचे शुभारंभ आज आ.फारुख शाहयांचे शुभ हस्ते करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील आर्वी सोनगीर ,बाळापुर, वडणे ,नकाने ,मेहरगाव तसेच आई एकवीरा देवी मंदिर जलाराम बाप्पा मंदिर यासाठी आ.फारुख शाहयांनी विशेष प्रयत्न करून धार्मिक स्थळांच्या विकास केला व तिथल्या मूलभूत सुविधा पुरविण्या कामी शासनाकडून भरघोस निधी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आजच्या परिस्थितीत धुळे शहरातील विकासांबरोबर शहराच्या सुशोभीकरण असो धार्मिक स्थळांच्या विकास असो आणि शासनाच्या विविध कार्यालयांच्या उभारणीसाठी आ.फारुख शाह यांनी शासनाकडून शेकडो कोटी रुपयांचा निधी आज शहरासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आ.फारुख शाह यांची राहिलेली आहे व राहणार आहे त्या अंतर्गत हा देवपूर ईदगाह मैदान येथे कुंपण भिंत आणि पेविंग ब्लॉक बसवणे कामाच्या शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आ.फारुख शाह यांचे सोबत सलीम शाह,नगरसेवक गनी डॉलर,अरिफ पठाण,डॉ. बापूराव पवार कैसर अहमद मौलाना शकील मोहम्मद शाह ,मुक्तार अली, मोहम्मद शेख,छोटू मच्छीवाले आफताब मिर्झा मसूद्दीन काझी जमील पेंटर नुरा ठेकेदार जुबेर मिर्झा आवेश शाह वसीम शेख तबरेज शाह वसीम शेख सय्यद अल्ताफ अली, समीर शहा, सलमान अंसारी ,असद शाह जुबेर शेख, आकीब अली अझहर सय्यद ,आसिफ शाह, शहजाद मांसुरी,शकील शेख,फैसल अन्सारी..